Pune News सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असणाऱ्या पुण्यात सासरा आणि सुनेच्या पवित्र नात्याला कलंक लावणारी घटना उडकीस आली आहे. एका निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्ताने नवविवाहित सुनेवर बळजबरी करुन शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला, मात्र पीडितेने कशीबशी सुटका करुन घेत पोलिस स्टेशन गाठले. यानंतर कधीकाळी रक्षक म्हणून वावरणाऱ्या माजी सहाय्यक पोलिस आयुक्ताचा लंपट चेहरा समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील सहकारनगर मध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडिता ही ३० वर्षांची असून तिचा महिन्यापूर्वी निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्ताच्या मुलाशी विवाह झाला आहे. आपला मुलगा पिता बनण्यास सक्षम नाही हे त्याच्या कुटुंबाला माहित होते याची माहिती लपवून पीडितेशी लग्न लावले.
लग्नानंतर आरोपी निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्ताने सुनेच्या खोलीमध्ये जाऊन सगळी परिस्थिती तिला सांगून मुलाकडून तुला अपत्य होणार नाही तुला माझ्याकडूनच या गोष्टी कराव्या लागतील अशी ऑफर दिली. हे ऐकून पीडितेच्या पायाखालची जमीनच हादरली. तिने कसेबसे स्वत:ला सावरले. या ऑफरला नकार देऊन कौशल्याने आपली सुटका करून घेतली अन् थेट पोलीस स्टेशन गाठले.
पीडितेने पोलिसांना सर्व हकीकत सांगितली. सर्व प्रकार ऐकूण पोलिसही अवाक् झाले. आता याप्रकरणी निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त सह त्याची पत्नी आणि पीडितेच्या पतीविरोधात सहकार नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
