फडणवीसांच्या लाडक्या नेत्याने राजकारणाला ठोकला राम राम

Mumbai news मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लाडक्या नेत्याने राजकारणाला राम राम ठोकला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. अनेकाच्या भुवाय उंचावल्या असून चर्चेला उधाण आलं आहे.

फ्री प्रेस जनरल या इंग्रजी माध्यमातील वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, वयाच्या अवघ्या 41 व्या वर्षी राजकारणातून त्यांनी सन्यास घ्यायचा निर्णय घेतला आहे.

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष, भाजपचे एकेकाळचे सर्वात श्रीमंत उमेदवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून कंबोज यांची ओळख आहे. गेल्या काही महिन्यांपासून कंबोज राजकारणांपासून लांब आहेत. मी माझ्या व्यवसायासाठी अधिक वेळ देऊ इच्छितो असे त्यांनी स्पष्ट केले आहे.