महादेववाडी-उंड्री पिसोळीचा विकास आता थांबणार करून दाखवतो शिवसेना शहर प्रमुखांचा नागरिकांना शब्द

पुणे Pune News- प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठीची प्रभागरचना शुक्रवारी अखेर जाहीर झाली. यामुळे गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या निवडणूक प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

प्रभाग क्रमांक 41 महादेववाडी-उंड्री येथील गोदरेज प्राणा सोसायटी, गोदरेज ग्रील आणि टाटा एलोना पार्क परिसरातील मुख्य डीपी रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी शिवसेनेचे शहर प्रमुख प्रमोद उर्फ नाना भानगिरे यांनी केली.

यावेळी स्थानिक नागरिकांनी त्यांच्या विविध समस्यांबद्दल चर्चा केली असता लवकरच येथील विकास कामे मार्गी लागतील याची ग्वाही दिली.

उंड्री परिसरातील नागरिकांना सोयीसुविधा आणि उत्तम जीवनमान मिळावे यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असून, रस्ते, पायाभूत सुविधा आणि विकासकामे वेळेत पूर्ण करून प्रत्येकाला सोयीस्कर व सुरक्षित वातावरण देण्याचा दृढ निश्चय यावेळी नागरिकांनी समवेत व्यक्त केला.