हडपसर प्रतिनिधी – : (Undri Pisoli) कालच पुणे महानगरपालिकेच्या बहुप्रतीक्षेत असलेल्या प्रभाग रचना जाहीर झाल्या या प्रभाग रचनेमुळे भारतीय जनता पार्टीत, व शिंदे शिवसेनेत कभी खुशी कभी गम पाहायला मिळाले तर अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला फटका बसणार असल्याचे बोलले जात आहे.
पुणे शहरातील प्रारुप प्रभाग रचनेत मध्यवर्ती भागातील प्रभागरचनेते मोठे बदल करण्यात आले आहे.
प्रभाग क्र. 41- महादेववाडी-उंड्री सातव नगर-हांडेवाडी रोड- महादेव वाडी-तरवडे वस्ती- चिंतामणी नगर- उद्योगनगर-कृष्णानगर- जाधवमळा- वाडकरमळा – ससाणे वस्ती – पिसोळी गाव – येवलेवाडी- वडाचीवाडी-औताडवाडी-होळकरवाडी- हांडेवाडी साठेनगर – काळेबोराटेनगर – म्हसोबा नगर सय्यद नगर — हेवन पार्क प्रभाग क्रमांक 41 मध्ये हे गावे जोडले गेले आहेत प्रामुख्याने या गावांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेमध्ये खरी टक्कर पाहायला मिळणार आहे, त्याचपाठोपाठ भारतीय जनता पार्टीचे देखील ताकत पाहायला मिळते.
पुणे महानगरपालिकेत महायुती जर झाली तर सर्वच इच्छुकांची मोठ्या प्रमाणात गोची होणार असल्याचे पाहायला मिळत आहे, सर्वच पक्षांनी आपापल्या परीने तयारी सुरू केल्याचे दिसून येत आहे.
शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत भाजपात होईल टफ फाईट
शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख प्रमोद उर्फ नाना भानगिरे यांचे महादेववाडी गाव देखील याच प्रभागात आले असल्यामुळे शिवसेनेला आयती मोठी ताकद मिळाली आहे; तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून त्यांनी परिसरातील विकास कामांसाठी करोडो रुपयांचा विकास निधी खेचून आणत मोठ्या योजना आणण्याचे काम केले, ग्राउंडवर काम नाना भानगिरे यांचा एन्ट्री त्यांच्या बाकी उमेदवारांना निश्चित पण फायदा होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
उंड्री भागात स्वाती टकले यांनी देखील जिल्हा परिषदेच्या माध्यमातून व विधानसभेचे आमदार विजय बापू शिवतारे यांच्या माध्यमातून करोडो रुपयांचा विकास निधी खेचून आणत त्यांनी परिसरातील समस्या सोडवल्या होत्या.
तर पिसोळी भागातून पिसोळीचे माजी सरपंच मच्छिंद्र दगडे यांनी देखील ग्रामपंचायतच्या माध्यमातून व वैयक्तिक स्तरावर अनेक समस्या सोडवताना नेहमी दिसून येतात शांत आणि मितभाषी चेहऱ्यामुळे या भागातून त्यांना देखील मानणारा मोठा वर्ग या भागामध्ये आहे.
शिवसेनेकडून इच्छुक उमेदवारांची नावे
पिसोळीचे माजी सरपंच मच्छिंद्र दगडे, उंड्रीच्या माजी जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख स्वाती टकले, स्वतः प्रमोद उर्फ नाना भानगिरे किंवा त्यांच्या सुविद्ध पत्नी, राकेश जांभळे, काका पवार, सातव, शिवसेनेकडे इच्छुकांची मोठी संख्या असल्याचे दिसून येत आहे.
तर भारतीय जनता पार्टीकडून
पिसोळीच्या माजी सरपंच तथा भारतीय जनता पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष स्नेहलताई दगडे, एडवोकेट प्रमोद सातव, राजेंद्र भिताडे, वडाच्यावाडीचे माजी सरपंच संदीप बांदल, माजी नगरसेविका प्राची आल्हाट, अतुल तरवडे आदी इच्छुक आहेत.
पिसोळी गावच्या माजी सरपंच तथा भाजपाच्या महिला जिल्हाध्यक्ष स्वर्गीय गणपत दगडे यांच्या पत्नी स्नेहलताई दगडे, दगडे यांना देखील मोठा मानणारा वर्ग आहे. वडाचीवाडीचे माजी सरपंच संदीप बांदल, माजी नगरसेविका प्राची आल्हाट हे देखील तगडे आव्हान निर्माण करू शकतात.
तर राष्ट्रवादीतून हवेली पंचायत समितीचे उपसभापती सचिन घुले, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य निवृत्ती बांदल, माजी नगरसेवक फारूक इनामदार, कलेश्वर घुले, राष्ट्रवादी काँग्रेस कडे देखील इच्छुकांची संख्या जास्त असल्याचे दिसून येत आहे.
सभापती सचिन घुले, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य निवृत्ती बांदल, व पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक फारूक इनामदार हे देखील तगडे आव्हान निर्माण करू शकतात.
मात्र या प्रभागात प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार व शिवसेना शिंदे गट यांच्यातच जोरदार लढाई होईल अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे.
