Pune News महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे १० नोव्हेंबर २०२४ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण उमेदवारांना १ ते ८ सप्टेंबर या कालावधीत प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत.इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्गांना शिकविण्यासाठी पेपर क्र.१ व इयत्ता सहावी ते आठवीसाठी पेपर क्रमांक २ अशी परीक्षा घेण्यात आली.
या परीक्षेचा अंतिम निकाल १४ फेब्रुवारी २०२५ रोजी परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर ऑनलाइन जाहीर झाला असून, पात्र उमेदवारांची प्रमाणपत्रे त्या त्या जिल्ह्यतील जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयाकडे देण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांनी परीक्षा परिषदेच्या www.mscelane.in या वेबसाइटवरील सूचना वाचून आवश्यक त्या मूळ कागदपत्रासह संबंधित कार्यालयाशी संपर्क साधून प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे.
