लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांच्यात बिनसलं; हाके भुजबळांची पोरं कामाची नाहीत हाकेच वादग्रस्त वक्तव्य

जालना : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मराठ्यांना ओबीसी जात प्रमाणपत्र देण्याच्या मागणीला विरोध करणारे सध्याच्या घडीतील चर्चेत असलेले दोन ओबीसी नेते हे आता एकमेकांच्या विरोधात ठाकले आहेत. विशेष म्हणजे मनोज जरांगे यांना आव्हान देण्यासाठी या दोन्ही नेत्यांनी अंतरवाली सराटी गावाच्या शेजारी असलेल्या वडीगोद्री गावात उपोषण केलं होतं.

या आंदोलनामुळे हे दोन्ही नेते राज्यभरात चर्चेत आले होते. जवळपास 10 दिवसांपेक्षा जास्त काळ त्यांनी ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणाची मागणी करत उपोषण केलं होतं. तत्कालीन महायुती सरकारच्या शिष्टमंडळाने या दोन्ही नेत्यांची उपोषणस्थळी भेट घेतली होती. या शिष्टमंडळात मंत्री छगन भुजबळ हे नवनाथ वाघमारे हे देखील या व्हिडीओवरुन चांगलेच संतापले आहे. संबंधित व्हिडीओ समोर आल्यानंतर नवनाथ वाघमारे यांनी आपल्या मनातील गेल्या अनेक दिवसांपासूनची सल बोलून दाखवली आहे.

 लक्ष्मण हाके यांच्यासोबत फिरताना आपला अनेकदा अवमान झाला. पण आपण कधीच बोलून दाखवलं नाही, असं नवनाथ वाघमारे म्हणाले आहेत. तसेच वाघमारे यांनी लक्ष्मण हाके यांना प्रसारमाध्यमांसमोर येत माफी मागण्याची मागणी केली आहे.

दुसरा प्रश्न राहिला आहे, त्यांनी छगन भुजबळ यांच्या मुलांविषयी वक्तव्य केलं आहे की, भुजबळांची पोरं कामाची नाहीत. भुजबळांनी दुसरं नेतृत्व मोठं होऊ दिलं नाही. पण कुणी कुणाचं नेतृत्व दाबत नसतं. आपल्याला काम करत राहायचं असलं. गेल्या अनेक दशकांपासून ओबीसींचे देशाचे आणि राज्याचे नेते छगन भुजबळ हे ओबीसींसाठी काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे ओबीसींचा मसिहा म्हणून पाहिलं जातं. जर तुम्हाला आज भुजबळांची जागा घ्यावीशी वाटत असेल तर हे दुर्दैवं आहे. तुम्ही उलटंसुलटं बोलून ही जागा घेता येणार नाही”, असं नवनाथ वाघमारे यांनी सुनावलं.