Pune News (Ganpati bappa) गणेशोत्सव आला म्हणजे अबाल वृद्धांना चाहूल लागते ती लाडया गणेशाच्या आगमनाच्या तयारीची, बच्चे कंपनीला तर त्यात विशेष रस पण त्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिस, थर्माकोलच्या वाढत्या वापराने नद्या व तलाव प्रदुषीत होत आहेत या सर्व बाबींचा विचार करून भगवती सेवा आश्रम व जीवन कौशल्य विकास यांच्या वतीने ईकोफ्रेंडली गणपती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
महाळूंगे येथील पुणे महानगरपालिकेच्या शाळेतील 425 विद्यार्थ्यांना शाडूमाती पासून पर्यावरण पूरक श्रीगणेश
मुर्ती बनवण्याची कार्यशाळा संपन्न झाली.
या कार्यशाळेला डॉ.वैजनाथ देशमुख, श्रीकांत कुंभार,व्यंकट अय्यर यांनी विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून गणपती मुर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण दिले
या कार्यक्रमाचे संकल्पन गीरीधर राठी, प्रकाशजी बोकील, डॉ.श्याम कुलकर्णी,उत्तमलाल रामधनी यांनी स्वयंसेवा केली व मार्गदर्शनात यंदाचा गणेशोत्सव पर्यावरण पूरक साजरा करण्याचे आवाहन जनतेला केले
सदर उपक्रमला शाळेच्या मुख्याध्यापिका सीमा पालव, सुनिता कोतकर, विद्या कुचेकर, मनिषा
भोंगळे, कविता साळूंके, राजेंद्र दिवटे, गणेश कदम शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका कर्मचारी यांनी सहकार्य केले.
