BHOSARI MOSHI NEWS लक्षवेध स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा कविताताई अल्हाट यांच्या पुढाकारातून भव्य मंगळागौर उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सलग तीन वर्षांपासून हा उत्सव महिलांसाठी आनंदाचा, उत्साहाचा आणि सांस्कृतिक जाणीवांचा ठरतो आहे.
या उत्सवात महिलांसाठी डान्स, गायन तसेच विविध प्रकारचे खेळ आयोजित करण्यात येणार आहेत. सहभागी महिलांना उत्तेजनार्थ आकर्षक व भरघोस बक्षिसांचे वितरण करण्यात येणार असून महिलांच्या सहभागातून कार्यक्रमात उत्साहाची लहर निर्माण होणार आहे.
हा कार्यक्रम २४ ऑगस्ट रोजी दुपारी २ ते रात्री १० या वेळेत रामकृष्ण लॉन्स, मोशी येथे पार पडणार आहे. आयोजक कविताताई अल्हाट यांनी महिलांनी या सांस्कृतिक जल्लोषात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.
