तळेगाव प्रतिनिधी – (Pune) तळेगाव दाभाडे येथे दहिहंडी उत्सव सुरु करुन साहसी उत्सवाला एका उंचीवर नेऊन ठेवले. तोच उत्साह, तीच तरुणाईची धुम, थरांचा थरार आणि गोविंदा रे गोपाळाचा जयघोष, मान्यवरांची मांदियाळी, गीत संगीतासह भगव्याचा जल्लोष यंदा शनिवार १६ ऑगस्ट २०२५ रोजी गोळवलकर, गोल मैदान छत्रपती शिवाजी महाराज चौक तळेगाव दाभाडे स्टेशन येथे पहायला मिळणार असून हा दिमाखदार सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन स्वर्गीय सचिन भाऊ शेळके मित्रपरिवार व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नितीन मराठे फ्रेंड सर्कलच्या वतीने आयोजित केला आहे,
या दहीहंडी उत्सवात चित्रपट सृष्टीतील नामवंत कलाकारांचा नृत्य व संगीतमय जल्लोष असणार आहे. तसेच सुप्रसिध्द मराठी तेजल शिंदे, मृणाल कुलकर्णी मालिकांमधील प्रसिद्ध नायक/नायिका उपस्थित राहणार आहेत.
