मोशी प्रतिनिधी – (Pimpri-Chinchwad) पिंपरी चिंचवड शहरातील मोशी येथे साईनाथ मित्र मंडळाच्या व नगरसेवक वसंत बोराटे यांच्या वतीने सर्वात मोठ्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे,
साईनाथ मित्र मंडळ गेल्या 17 वर्षापासून पिंपरी चिंचवड शहरातील मोशी भागात विविध सामाजिक उपक्रम घेत मित्रमंडळाने आपला नावलौकिक नेहमी वाढवला आहे, कोरोनाचा काळ असो किंवा लसीकरणाचा काळ, पूर परिस्थितीत देखील लाखो विद्यार्थ्यांना कोल्हापूर येथे जात शालेय साहित्य वाटप करणे असो किंवा अन्नधान्य पुरवणे रक्तदान शिबिरे घेणे अशा विविध उपक्रम साईनाथ मित्र मंडळ आयोजित करते.
तोच उत्साह, तीच तरुणाईची धुम, थरांचा थरार आणि गोविंदा रे गोपाळाचा जयघोष, मान्यवरांची मांदियाळी, गीत संगीतासह भगव्याचा जल्लोष यंदा शनिवार १६ ऑगस्ट २०२५ रोजी मोशी येथील वैशाली स्वीट होम जवळ कॉसमॉस ग्राउंड देहू रस्ता पहायला मिळणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक वसंतशेठ बोराटे व वसंत मित्र मंडळ यांच्या वतीने भव्य स्वरूपात केलेले आहे,
सिने अभिनेती कीर्ती खरबंदा, पूजा पुरंदरे, निशा बोरुले, प्रसिद्ध गायक अवधूत गांधी, सुप्रसिद्ध कीर्तनकार पुरुषोत्तम महाराज पाटील,
या दहीहंडी उत्सवात नामवंत गायक तसेच चित्रपट सृष्टीतील नामवंत कलाकारांचा नृत्य व संगीतमय जल्लोष असणार आहे.
